विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता बस सेवा सुरू करा* *भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची आगार प्रमुख यांच्याकडे मागणी*

*विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता बस सेवा सुरू करा*

*भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची आगार प्रमुख यांच्याकडे मागणी*

कोरपना तालुक्यातील नारंडा ते गडचांदूर ही बस सेवा विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता सुरू करण्यात यावी अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राजुरा आधार प्रमुख राकेश बोधे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

 

नारंडा या गावातून वर्ग ५ ते वर्ग १० करिता अनेक विद्यार्थी शालेय शिक्षणाकरिता गडसंदुरला ये-जा करतात परंतु एकही बस सेवा या वेळेला उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नारंडा वरून गडतांदूळकरिता सकाळी १० वाजता व गडचांदूर वरून नारंडा करिता सायंकाळी ५ वाजता बस सेवा सुरू करावी तसेच सदर बस सेवा सुरू झाल्यास या मार्गावरील सोनुर्ली, आसन खुर्द, वडगाव, खिर्डी, इंजापूर, धामणगाव इत्यादी गावातील सुद्धा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

आपण सदर मागणीवर सकारात्मक विचार करून नारंडा ते गडचांदूर बस सेवा या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू झाल्यावर सुरू करू अशी आश्वासन राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे यांनी यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने व उपस्थित पालकांना दिले.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *