सूर्य सेतू एनर्जी’ प्रतिष्ठानचे उद्घाटन

‘सूर्य सेतू एनर्जी’ प्रतिष्ठानचे उद्घाटन.*

*📍 रामपूर ता.राजुरा*

ग्रामीण भागात विजेची उपलब्धता वाढवणे आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मौजा रामपूर येथे काल श्री.ओम रमेश बोंडे यांच्या ‘सूर्य सेतू एनर्जी’ या नवीन प्रतिष्ठानचे उद्घाटन केले.

भविष्यात विजेची गरज लक्षात घेता सौर ऊर्जा हाच एकमेव सर्वोत्तम पर्याय आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना अखंडित व स्वस्त वीज मिळण्यासाठी अशा प्रकारच्या ऊर्जा प्रतिष्ठानची मोठी मदत होईल. सूर्य सेतू एनर्जी प्रतिष्ठानने ग्रामीण भागात घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.असा आशावाद व्यक्त करीत ‘सूर्य सेतू एनर्जी’ प्रतिष्ठानच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी माझ्यासमवेत माजी जि.प.सभापती सुनील उरकुडे,भाजपाचे राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, शहर महामंत्री सचिन भोयर, नगरसेवक प्रफुल कावळे,अरुण भोयर, शेषराव बोंडे, रमेश बोंडे, मुकरू शेलोटे यांचेसह बोंडे परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *