Site icon जनता की आवाज MH34

घुग्घुस येथे बॅक्वर्ड क्लास कोल एम्पलॉईज वेलफेअर असोसिएशनचे वार्षिक अधिवेशन संपन्न

 

घुग्घुस: येथील प्रयास सभागृहात मंगळवार, २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बॅक्वर्ड क्लास कोल एम्पलॉईज वेलफेअर असोसिएशन (वेकोलि नागपूर) चे प्रथम वार्षिक अधिवेशन मोठया उत्साह पार पडले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष गुलाब सिंह, महासचिव जयबहादूर यादव, सुदामा यादव, राकेश कडू, दिपक टिकले, दीपक चटप मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.

बॅक्वर्ड क्लास कोल एम्पलॉईज वेलफेअर असोसिएशनची ओबीसी समाजाच्या अधिकारासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी स्थापना करण्यात आली आहे. केंद्रातर्फे ओबीसीला २७% आरक्षण नौकरीसाठी देण्यात येते परंतु पदोन्नतीसाठी ओबीसी समाजाला सवलत मिळत नाही. यासाठी आमचा लढा सुरु आहे आता या लढ्याने गती पकडली आहे. ओबीसी समाजाला हक्क मिळवून दिल्याशिवाय ही संघटना चुप बसणार नाही असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
संचालन अजय पाटील यांनी केले.

यावेळी अध्यक्ष वणी क्षेत्र ओबीसी असोसिएशन संकेत खोकले, महामंत्री श्रीकांत सावे, घुग्घुसचे अध्यक्ष घनश्याम कुटेमाटे, सचिव तुलसीदास ढवस, मुंगोलीचे अध्यक्ष सुधाकर आसुटकर, सचिव सुधीर पिंपळकर, नायगावचे अध्यक्ष अक्षय धोबे, सचिव श्रीराम रोडे, निलजईचे अध्यक्ष अक्षय कौरासे, सचिव राजु कुचनकर, पैनगंगाचे अध्यक्ष राम यादव, दीपक काळे, सावन ठाकरे, संतोष धोबे, संजय ताजने आदींची उपस्थिती होती.

Share it
Exit mobile version