Site icon जनता की आवाज MH34

बकरी ईद त्याग आणि समर्पणाचे प्रतीक: विवेक बोढे

घुग्घुस, चंद्रपुर : शहरात बकरी ईद गुरुवार, २८ मे रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह येथे मुस्लिम समाज बांधवांतर्फे नमाज अदा करण्यात आली. नमाज अदा केल्यानंतर भाजपा नगर सेवक विवेक बोढे यांनी मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपा नगर सेवक विवेक बोढे म्हणाले, बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा अत्यंत महत्वाचा सण आहे. जो त्याग आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण बंधुभाव, क्षमाशीलता आणि एकमेकांना मदत करण्यास प्रोत्साहन देतो.

यावेळी भाजपा नगर सेवक विवेक बोढे, ठाणेदार प्रकाश राऊत व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Share it
Exit mobile version