Site icon जनता की आवाज MH34

पाण्यावरून जनतेचा संताप उफाळला! घुग्गूस नगर परिषद कार्यालयाला नागरिकांचा घेराव

पाण्यावरून जनतेचा संताप उफाळला!

घुग्गूस नगर परिषद कार्यालयाला नागरिकांचा घेराव

घुघुस शहरातील पाणीटंचाईच्या समस्येमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला असून, संतप्त नागरिकांनी घुघुस नगर परिषद कार्यालयावर घेराव घातला. अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक ३ मध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यावेळी नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “कामापेक्षा जास्त राजकारण केले जात आहे” असा आरोप केला. पाणीपुरवठ्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा,असा इशाराही नागरिकांनी दिला.

या पार्श्वभूमीवर सोमवार, २ जून २०२६ रोजी घुग्घूस नगरपरिषद कार्यालयात प्रभाग 3 च्या महिलांनी मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांना घेराव घालत पाणी टंचाईबाबत जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप महिलांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांच्या मते, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असून पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

🔴 “कामापेक्षा जास्त राजकारण” केल्याचा नागरिकांचा आरोप

 

प्रतिनिधी

सचिन कोंडावार

Share it
Exit mobile version