Site icon जनता की आवाज MH34

घुग्घुस बसस्थानक परिसरात पार्किंग व्यवस्थेचा अभाव; नागरिक व बसचालक त्रस्त

घुग्घुस बसस्थानक परिसरात पार्किंग व्यवस्थेचा अभाव; नागरिक व बसचालक त्रस्त

 

Screenshot

घुग्घुस नगरपरिषदेकडून काही दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांचे पुनर्वसनही करण्यात आले. मात्र, अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी योग्य पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली नाही.

Screenshot

पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने दुचाकी व इतर वाहने बसस्थानक परिसरातच उभी केली जात आहेत. त्यामुळे बसचालकांना बस वळविणे व प्रवाशांची चढ-उतार प्रक्रिया करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे बसस्थानक परिसरात तातडीने नियोजित पार्किंग व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. अतिक्रमण हटविण्याबरोबरच नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

“अतिक्रमण हटले, पण पार्किंगचा प्रश्न कायम; प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी”, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share it
Exit mobile version