Site icon जनता की आवाज MH34

अभिष्टचिंतन व रुग्णवाहिका लोकार्पण

जिवती

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपुर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री. महेश देवकते यांचे दि. २९ मे रोजी वाढदिवस होते; त्यानिमित्तानं जिवती शहरातील शांतीनगर परीसरात आयोजित महिला महोत्सवावेळी केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन केले.
प्रसंगीच, जिवती सारख्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या गोरगरीब आणि गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत, उपचाराअभावी कोणाचेही प्राण जाऊ नयेत, या अत्यंत संवेदनशील उद्देशाने श्री. महेश देवकते यांच्या मित्रपरिवाराने एकत्र येत स्वखर्चाने तालुक्याच्या रूग्णसेवेत एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली; या रुग्णवाहिकेचे सर्वांसह लोकार्पण केले.

ही रुग्णवाहिका जिवती परिसरातील नागरिकांच्या २४ तास सेवेत विनामूल्य व तातडीने उपलब्ध राहणार आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून, सामाजिक बांधिलकी जपत जिवतीकरांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या श्री. महेश देवकते मित्रपरिवाराचे मी मनापासून कौतुक करतो. खरंतर भारतीय जनता पक्षाचा संस्कार हा सेवेचा आहे. त्यानुसारच सेवाभावी कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरे, महाआरोग्य शिबीरे, अन्नदान इ. सेवाभावी उपक्रमांतून जनसेवा केली जाते. हाच ध्यास घेऊन रुग्णवाहिकेच्या रुपाने सुरू होणार्‍या पहाडावरील या स्तुत्य उपक्रमाच्या पुढील यशस्वी अंमलबजावणीसाठी माझ्या भरपूर शुभेच्छा!

यावेळी माझ्यासमवेत पत्नी सौ. अर्चना, मुलगी आराध्या, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जेष्ठ नेते बळीरामजी देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, जिवती तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जिल्हाभरातून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Share it
Exit mobile version