कोरपना: लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जनता खंबीरपणे भाजपाच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने नारंडा-कोडशी पंचायत समिती क्षेत्रातील कार्यकर्ता मेळावा, बूथ प्रमुख, गाव प्रमुखांचा सत्कार व पक्षप्रवेश सोहळ्यात काँगेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल आमदार देवराव भोंगळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.
पुढे बोलतांना आमदार भोंगळे म्हणाले की, रस्ते, पाणी, शिक्षण,आरोग्य,वीज आदी अनेक मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी विविध विकास योजना राबविल्या जात असून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे भाजपाचे केवळ आश्वासन नसून तो आमच्या कृतीचा भाग आहे. लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य भाजपा सातत्याने करीत आहे.असेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये नारंडा येथील बंडू काळे रामचंद्र आगलावे, विलास कोडापे, विजय चूरे , सुरेश गोहणे, सुनील काळे, देवानंद सोनुले, सचिन लोहे , धनराज चौधरी, सुरज खामनकर, मारोती पेटकर, दिलीप शेंडे, विठ्ठल लेनगुडे, विजय मोहूर्ले , तुळशीराम काळे, अवन शेंडे, अमोल कुचनकर, गणेश उपरे, शुभम काळे लोकेश मोहूर्ले, सुमित निमकर, वैभव शेंडे, योगेश शेंडे, अनिकेत घुगुल, मंगेश गाडगे, दिलीप मुद्दलवार, सुनील उपरे, अनिल देवाळकर, राजकुमार उपरे , विकास मुद्दलवार, भिमराव देवाळकर, राजू पवार, सुरज मुद्दलवार, संजय मुद्दलवार, सुनील मुद्दरवार विलास शेंडे, शुभम अंदनकर , शेरज (खुर्द) येथील अविनाश कोट्टे, रवी उराडे, सुरेंद्र ढवळे, विश्वास गिलबिले, गणपत बावणे, विवेकानंद हुलके, मनोज उराडे, विनायक हुलके, सतीश उराडे, मौजा तांबाडी येथील संजय डवरे, गजानन ताजने, संतोष दरेकर, किशोर पाचवाई, अमित कोल्हे, विजय ठावरी, नरेश सिडाम, ओम प्रकाश कुळसंगे, गजानन रोगे, सुजल विधाते, आदित्य जाधव, दिवाकर खाडे, महादेव ढेंगळे, शालिक कांबळे, मौजा हेटी येथील नानाजी साखरकर, हर्षल साखरकर, कुणाल निपुंगे, सिद्धार्थ जगनाडे, आशिष दोहनकर ,कुणाल पारखी, मौजा गांधीनगर येथील विनोद रागीट, अमोल मालेकर, रविंद्र ठावरी, गणेश महाकुलकर, अरविंद कुळसंगे, रवींद्र चटारे, मनोहर पेटकर, राहुल वासेकर, मंगेश मालेकर, मौजा पिपरी येथील बंडू ढेंगळे, शशिकांत जेनेकर, मधुकर बावणे, दिलीप बोढे, सुरज देवतळे, गुलाब मेश्राम, विकास ढेंगळे, मंगेश काकडे, पोचू देवतळे, उमेश कुंभारे, सुरेश इटकेलवार, मिलिंद चायकाटे, दयानंद देवतळे, विलास सोनटक्के, बाळू तिखट, प्रज्वल आंबेकर धनराज रागीट, मौजा कोडशी (खुर्द) येथील कवडू ताजणे, सचिन ताजणे, महेश बोरडे, गणेश मांडवकर, नरेश नांदेकर, विलास पिदुरकर, राजू बोरडे, राजू मोहजे यांचा समावेश आहे.
राजुरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले असून आम्ही सर्वांगीण विकासासाठी भाजपात जाहीर पक्षप्रवेश करीत असल्याची भावना नवप्रवेशीत कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नारंडा-कोडशी पंचायत समिती क्षेत्रातील कार्यकर्ता मेळावा, बूथ प्रमुख, गाव प्रमुखांचा सत्कार सोहळा आमदार देवराव भोंगळे यांचे उपस्थितीत उत्साहात पार पडला.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, भाजपाचे गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, नगर परिषद गडचांदूरचे गटनेता सतीश बेतावार, नारंडा येथील सरपंच अनु ताजने, उपसरपंच बाळा पावडे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोंहे, शितल धोटे, सपना सेलोकर, कीर्ती वैरागडे, संगीता गावत्रे, अरुणा बेतावार, मंजुषा ताजणे, स्वाती पांढरे, रंजना शेंडे, रूपाली उरकुडे, सुरेश मेश्राम, सुरेश पांडे, वसंता ताजणे, विनोद डोहे अविनाश वाभीटकर, संजय पिंपळशेंडे, शशिकांत आडकिने, नैनेश आत्राम, मारोती गोखरे, अनिल शेंडे, नागोबा उरकूडे, महादेव खाडे, सुरेश परसुटकर बाळू कुंभारे, दीपक वरभे, यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

