प्रभाग क्रमांक ४ मध्ये गजानन महाराज मंदिर परिसरातील नालीची दुरवस्था; नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
घुग्घुस शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील गजानन महाराज मंदिर परिसरातील नालीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी नाली तुटलेली असून गाळ व कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
नालीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने व काही ठिकाणी नाली तुटल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, दुरुस्ती तसेच अंडरग्राउंड नालीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे.

