घुग्घुस-नकोडा परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भीषण उकाड्यात तासन्तास लाईट नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातील लहान मुले, वृद्ध तसेच रुग्ण उकाड्याने हैराण झाले असून व्यापारी व विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करूनही MSEDCL प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. Share it Post navigation बकरी ईद त्याग आणि समर्पणाचे प्रतीक: विवेक बोढे आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डिझेलसाठी दररोज ३० लिटर राखीव कोट्याला मंजुरी