घुग्घुसमध्ये पाणीटंचाईवरून राजकारण तापले; प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचा संताप

घुग्घुस शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करत काही नागरिकांनी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टरमधून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती, जलसेवक आणि संबंधित नगरसेवकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

पोस्टरमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी, टँकरच्या संख्येत झालेली घट, तसेच नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “राजकारण नंतर करा, आधी पाणी द्या” अशी मागणीही पोस्टरद्वारे करण्यात आली आहे.

 

नागरिकांनी प्रशासनाने एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात, टँकरची संख्या वाढवावी आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या आरोपांवर संबंधित लोकप्रतिनिधी किंवा नगरपरिषदेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पाणीटंचाईच्या समस्येवर प्रशासन कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *