नगरसेवकाची प्रेयसीला मारहाण; दोन वर्षांपासून सुरू होते प्रेमसंबंध

घुग्घुस: नगर परिषदेचे अपक्ष निवडून आलेले नगर सेवक पंकज धोटे यांनी एका प्रेयसीला प्रेमसंबंधातून मारहाण केली.

घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून एका नगरसेवकाने आपल्या प्रेयसीला मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवक आणि तरुणी यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते

गुरुवार, ४ जुन रोजी सकाळी १० वाजता लॉयड्स मेटल्स कंपनीच्या प्रवेश द्वारा जवळ फिर्यादी तरुणी उभी असतांना आरोपी नगर सेवक पंकज धोटे यांनी तिथे जाऊन तु कोणाशी बोलते असे म्हणून हाताबुक्क्याने व पायातील जोड्याने मारहाण केली मारहाणीत महिलेच्या डोक्याला दुखापत झाली पिडीत महिलेने पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. तक्रारीवरुन आरोपी नगर सेवक पंकज धोटे यांच्याविरुद्ध कलम ११८(१), ३५१(२), ३५२ गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *