स्नेहमिलन सोहळ्यातून कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होते – आमदार देवराव भोंगळे

घुग्गुस: आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण आपल्या जीवनात व्यस्त आहे. अशा वेळी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून परिवाराने एकत्र येणे आवश्यक असते. नवीन पिढीला आपल्या नातेसंबंधांची आणि संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन कौतुकास्पद असून अशा स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होते,असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

घुग्गुस येथील प्रयास सभागृहात आमदार देवराव भोंगळे यांचे संकल्पनेतून भोंगळे परिवाराचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा काल अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, नाती टिकली तरच समाज टिकेल आणि समाज टिकला तरच आपली संस्कृती अधिक समृद्ध होईल.स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्याने एकमेकांबद्दल मनात असणारी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि आदर वृद्धिंगत होऊन नात्याची वीण अधिक घट्ट होते, त्यामुळे असे कौटुंबिक स्नेहमिलन सोहळे आयोजित करणे आज काळाची खरी गरज असल्याचेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.

या स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविकातून बोलतांना सौ.अर्चना देवराव भोंगळे म्हणाल्या की, आपल्या भोंगळे परिवार स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्याने आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत सुवर्ण आणि आनंदाचा क्षण आहे. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने आज हे प्रयास सभागृह एका मोठ्या कौटुंबिक उत्सवाने उजळून निघाले आहे. आमदार श्री. देवरावजी भोंगळे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात आजवर अनेक मेळावे, सभा आणि कार्यक्रम घेतले , हजारो लोकांचे नेतृत्व केले, परंतु, आपल्या हक्काच्या माणसांना, आपल्या रक्ताच्या नात्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न त्यांच्या आणि माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि मनाच्या जवळचा आहे. देवरावजींचे जन्मगाव असलेल्या या औद्योगिक घुग्घूस नगरीत, जिथे त्यांचे बालपण गेले आणि ज्या मातीने त्यांना घडवले, त्याच जन्मगावात आज संपूर्ण चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील भोंगळे परिवार एकत्र आला आहे, याचे मला मनस्वी समाधान आणि अभिमान वाटते. आपल्यातील ‘ऋणानुबंध’ अधिक दृढ करणे हाच स्नेहमिलन सोहळ्याचा उद्देश असून एकमेकांची सुख-दुःखे जाणून घेणे, परस्परांना ओळखणे आणि संकटसमयी किंवा आनंदाच्या प्रसंगी संपूर्ण परिवार एकजुटीने पाठीशी उभा राहणे, हीच आपल्या कुटुंबाची शक्ती असल्याचेही सौ.भोंगळे यांनी सांगितले.

यावेळी भोंगळे परिवारातील सदस्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ‘आपली माणसे हीच आपली खरी संपत्ती’ असल्याचा मोलाचा संदेश या कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्याने दिला.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, सेवानिवृत्त प्राचार्य दौलतराव भोंगळे, रमेश भोंगळे, देवाजी भोंगळे, भास्कर भोंगळे, गणेश भोंगळे, वसंतराव भोंगळे, बंडू भोंगळे, पंडित भोंगळे, माणिक भोंगळे, सुभाष भोंगळे, शंकर भोंगळे, पुंडलिक भोंगळे, तुळशीराम भोंगळे, केशव भोंगळे, शालिकराव भोंगळे, संजय भोंगळे, सुर्यकांत भोंगळे, महेंद्र भोंगळे, अमृत भोंगळे, अरुण भोंगळे, जनार्धन भोंगळे, सदानंद भोंगळे, प्रकाश भोंगळे, दिलीप भोंगळे, रुपेश भोंगळे, संगीता भोंगळे, सतीश भोंगळे, रामदास भोंगळे, शंकर भोंगळे , सुभाष भोंगळे, गणेश भोंगळे, गजानन भोंगळे, घनश्याम भोंगळे, दिवाकर भोंगळे, हनुमान भोंगळे, नामदेव भोंगळे, प्रभाकर भोंगळे, विनोद भोंगळे, बापूराव भोंगळे, विजय भोंगळे, भाग्यश्री भोंगळे, भाऊजी भोंगळे, चंद्रभान भोंगळे, सचिन भोंगळे, नीलकंठ भोंगळे, शामसुंदर भोंगळे, शंकर भोंगळे, देवराव भोंगळे, सदाशिव भोंगळे, प्रभाकर भोंगळे, सुधाकर भोंगळे, गणेश भोंगळे, अशोक भोंगळे, जगदीश भोंगळे, सुधाकर भोंगळे, योगेश्वर भोंगळे, वसंत भोंगळे, दौलत भोंगळे, मोरेश्वर भोंगळे, विनोद भोंगळे, उमेश भोंगळे, अशोक भोंगळे, विठोबा भोंगळे, नंदकिशोर भोंगळे, नथूजी भोंगळे, गजानन भोंगळे, शामराव भोंगळे, वसंतराव भोंगळे, वसंत भोंगळे, वसंत भोंगळे, पुरुषोत्तम भोंगळे, पिलाजी भोंगळे, अनिल भोंगळे, योगेश्वर भोंगळे, अरुण भोंगळे, बापुजी भोंगळे, मनोहर भोंगळे, शामसुंदर भोंगळे, हेमंत भोंगळे, जीवन भोंगळे, पवन भोंगळे, प्रवीण भोंगळे, विठ्ठल भोंगळे, भाऊराव भोंगळे, रूंदा भोंगळे, शांताराम भोंगळे, संतोष भोंगळे, मनोज भोंगळे, बालाजी भोंगळे, बाबाराव भोंगळे, भोजराज भोंगळे, कृष्णाराव भोंगळे, सुरेश भोंगळे, तातोबा भोंगळे, दिवाकर भोंगळे, नरेश भोंगळे, वसंता भोंगळे, पांडूरंग भोंगळे, विजय भोंगळे, शंकर भोंगळे, प्रभाकर भोंगळे, विश्वनाथ भोंगळे, मारोती भोंगळे, उमाकांत भोंगळे, राजू भोंगळे, अंकुश भोंगळे, अरुण भोंगळे, विजय भोंगळे, सुरेश भोंगळे, चरणदास भोंगळे, विजय भोंगळे, दौलत भोंगळे, देविदास भोंगळे, यशवंत भोंगळे, गजानन भोंगळे, नामदेव भोंगळे, नीलकंठ भोंगळे, बाबाराव भोंगळे, कवडू भोंगळे, प्रमोद भोंगळे, सुरेश भोंगळे, रमेश भोंगळे, हरीश्वर भोंगळे, तिलाजी भोंगळे, लक्ष्मीबाई भोंगळे, प्रभाकर भोंगळे, किशोर भोंगळे, रवींद्र भोंगळे, विठ्ठल भोंगळे, विजय भोंगळे, रोहित भोंगळे, भास्कर भोंगळे, मनोरमा भोंगळे, सुधाकर भोंगळे, रमेश भोंगळे, मोहन भोंगळे. राहुल भोंगळे, पियुष भोंगळे, उमेश भोंगळे, सुरेंद्र भोंगळे, गजानन भोंगळे, सतीश भोंगळे, शुभम भोंगळे, यश भोंगळे, मुग्धानंद भोंगळे, दिवाकर भोंगळे, निखिल भोंगळे, श्रीमती गिरजाबाई भोंगळे, सौ.अर्चना भोंगळे, प्रभावती भोंगळे, ताणेबाई भोंगळे, बायाबाई भोंगळे, लक्ष्मीबाई भोंगळे, यांचेसह चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील भोंगळे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *