बल्लारपूर विधानसभेत तब्बल १०,०२३ नागरिकांनी ऐकली ‘मन की बात’; कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक बल्लारपूरला देशातील अव्वल ‘मन की बात’ मतदारसंघ बनविण्याचा निर्धार; कार्यकर्त्यांना आ. मुनगंटीवार यांचा सलाम *चंद्रपूर, दि. २ जून : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १३४व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १०० टक्के बूथवर यशस्वी आयोजन करत तब्बल १०,०२३ नागरिकांपर्यंत हा संवाद पोहोचविण्यात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या प्रभावी संघटनात्मक कामगिरीची भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी विशेष दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांना अभिनंदनपर पत्र पाठविले आहे.प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पत्रातून आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि समर्पित कार्याचे कौतुक केले असून, १०० टक्के बूथ लक्ष्य पूर्ण करून ‘मन की बात’ अभियान यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले आहे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी थेट संवाद साधतात. या कार्यक्रमातून समाजातील सकारात्मक, प्रेरणादायी आणि राष्ट्रहिताच्या कार्यांना व्यापक व्यासपीठ मिळते. सामान्य नागरिकांच्या असामान्य कार्याची दखल घेत देशाला प्रगत, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळते. त्यामुळे ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून जनजागृती आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रभावी उपक्रम ठरला आहे. दिनांक ३१ मे २०२६ रोजी प्रसारित झालेल्या १३४व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या निमित्ताने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बूथस्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला. बल्लारपूर मतदारसंघात १०० टक्के बूथवर उत्कृष्ट कार्यक्रम केला त्यामुळे तब्बल १०,०२३ नागरिकांनी कार्यक्रमाचे श्रवण केले. यामुळे संघटनात्मक बळ, कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि जनसंपर्काची प्रभावी क्षमता अधोरेखित झाली. या उल्लेखनीय यशाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे तसेच मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाजप परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पक्षाच्या विचारांचा प्रसार, केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि माननीय पंतप्रधानांच्या संवादाशी नागरिकांना जोडण्याचे कार्य प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात १०० टक्के बूथ लक्ष्य पूर्ण झाल्याबद्दल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचे मनस्वी अभिनंदन. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल १०,०२३ नागरिकांनी मन की बात कार्यक्रमाचे श्रवण केले. ही केवळ आकडेवारी नसून आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेची, समर्पणाची आणि संघटनशक्तीची जिवंत साक्ष आहे. बल्लारपूर विधानसभेत भाजपाचे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. प्रत्येक बूथवर, प्रत्येक गावात आणि प्रत्येक वॉर्डात कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रमच या यशामागची खरी ताकद आहेत. बल्लारपूर विधानसभेतील समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावरच संघटन, सेवा आणि जनसंपर्काच्या क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत राहील, याची मला पूर्ण खात्री आहे. अशीच एकजूट, अशीच जिद्द आणि राष्ट्रसेवेची हीच भावना कायम ठेवत बल्लारपूर विधानसभा देशातील सर्वाधिक मन की बात श्रवण करणाऱ्या मतदारसंघांपैकी एक बनविण्याचे आपले स्वप्न आपण निश्चितपणे साकार करू. बल्लारपूर विधानसभेतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाला मनःपूर्वक सलाम. आगामी काळातही आपल्या सर्वांच्या साथीने यशाची नवी शिखरे गाठू, हा विश्वास व्यक्त करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाने ‘मन की बात’ अभियानात नोंदविलेली ही कामगिरी भाजपच्या मजबूत संघटनशक्तीचे आणि कार्यकर्त्यांच्या राष्ट्रहिताच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. Share it Post navigation घुग्गुस येथे भोंगळे परिवाराचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न