मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट : गडचांदूरच्या नागरी विकासासह जिवतीतील दुग्ध व्यवसाय विकासविषयक मुद्द्यांवर चर्चा. दि. 29 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथील शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी गडचांदूर शहरातील नागरी विकास, मूलभूत सुविधा व नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिवती या दुर्गम व आदिवासीबहुल भागातील शेतकरी व ग्रामीण युवकांसाठी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार व उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मा. मुख्यमंत्री महोदयांनी विषयांची दखल घेत गडचांदूर शहराच्या विकासासह जिवती परिसरातील विकासात्मक उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकरी व युवकांसाठी उपयुक्त योजना राबविण्याबाबतही चर्चा झाली. याप्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे तसेच बँकेचे मानद सचिव मा. अवेशखान पठाण उपस्थित होते. गडचांदूरच्या नागरी विकासाला तसेच जिवती परिसरातील दुग्ध व्यवसाय, रोजगारनिर्मिती व उत्पन्नवाढीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. Share it