Mallikarjun Kharge आणि Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर संघटन मजबूत करण्यासाठी विविध नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्हानिहाय प्रत्यक्ष भेटी घेऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे आणि प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती (SC) विभागाच्या विविध ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक कार्याध्यक्ष पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. Screenshot याच पार्श्वभूमीवर घुग्घुसचे “देवेंद्र राजेश्वर भंडारी “यांची चंद्रपूर ग्रामीण तालुका अनुसूचित जाती (SC सेल) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी देवेंद्र भंडारी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. Screenshot Share it Post navigation नियम धाब्यावर बसवून बांधकाम? लाईट मेटल अँड एनर्जी लिमिटेड विरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा नकोडा गावातील बसस्टँडचा प्रश्न ऐरणीवर