महिला महोत्सव म्हणजे लाडक्या बहिणींच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ -आमदार देवराव भोंगळे

जिवती : आजची महिला ही केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्या पुरती मर्यादित नसून ती उद्योग, शिक्षण आणि समाजकारणातही आघाडीवर आहे. जेव्हा घरातील एक महिला प्रगती करते, तेव्हा पूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाज,देश प्रगती पथावर जातो. महिला शक्तीचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील जिवती सारख्या अती दुर्गम आकांक्षित तालुक्यात आयोजित करण्यात आलेला हा महिला महोत्सव म्हणजे लाडक्या बहिणींच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ आहे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

जिवती येथील शांतीनगर मैदानात आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चाच्या वतीने काल आमदार मा. ना. श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार महिला महोत्सव- २०२६ चे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

पुढे बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांमध्ये प्रचंड प्रतिभा आणि कौशल्य असते, परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. मात्र अशा महिला महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे हा महिला महोत्सव म्हणजे लाडक्या बहिणींच्या आनंदाचा आणि उत्साहाचा हा कलाविष्कार भविष्यात नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी एकल नृत्य स्पर्धेत प्रथम बक्षीस मनिषा पवार रा.झाँजनेरी, द्वितीय सीमा मडावी रा.,आंबेझरी, तृतीय बक्षीस पुष्पा मोतेवाड रा.दमपूर मोहदा, यांनी पटकविले, तर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम बक्षीस जय सेवा ग्रुप आंबेझरी, द्वितीय बक्षीस हिरासुका ग्रुप जिवत्ती, तर तृतीय क्रमांकाचे विजेतेपद गोंडी ढेमसा ग्रुप रा.पल्लेझरी,यांनी पटकाविले. यावेळी विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी सौ.अर्चना भोंगळे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे जिवती तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, राजेश राठोड, नगराध्यक्षा अनुसयाबाई राठोड, महामंत्री गोविंद टोकरे, अशपाक शेख, आनंद कदम, अंबादास कंचकाटले, चंद्रकांत घोडसे, दिगंबर आंबटकर, संतोष जाधव, श्रीदास राठोड, बाळू ठोंबरे, भाजपाचे राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, भाजपाचे गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, दिलीप गिरसावळे, सतीश बेतावार, राजुरा शहर महामंत्री सचिन भोयर, शितल धोटे, गडचांदूर नगरसेवक हिमांशू नामवाड , तन्मय देशकर, सुरज पांडे, शितल धोटे, सपना सेलोकर, बळीराम देवकते, ओम पवार, कार्तिक गोंलावार, साकेत भानारकर, सुनीता नामवाड, चंद्रकला सोयांम, सेमा राठोड, कमलाबाई राठोड, चांदणी शेख,पुष्पा सोयाम, चंद्रकांला उईके, वर्षा गुरमे, विमल राठोड, चेतना राठोड यांचेसह भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *