छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक शौचालय केवळ शोभेची वस्तू; सुरू करण्याची नागरिकांची मागणी

घुग्घुस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नगरपरिषदेकडून सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही हे शौचालय अद्याप सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही सुविधा सध्या केवळ शोभेची वस्तू बनल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, प्रवासी व व्यापारी वर्गाची वर्दळ असते. सार्वजनिक शौचालय बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.

स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सार्वजनिक शौचालय सुरू करावे, तसेच त्याची नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

प्रतिनिधी
सचिन कोंडावार

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *