थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आज राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अखंड भारताच्या क्रांतीचे प्रखर जळते निखारे होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या काळ्या पाण्याची क्रूर शिक्षा भोगतानाही ज्यांचा देशप्रेमाचा हुंकार किंचितही कमी झाला नाही, अशा क्रांतीसूर्याचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी वंदनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि त्यांचे कर्तृत्व सूर्यासारखे प्रकाशमान असून त्यांच्या विचारांवर चालून आपण सर्वांनी सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन आमदार श्री. देवरावदादा भोंगळे यांनी दिलेल्या संदेशातून कार्यकर्त्यांना केले.

यावेळी भाजपाचे राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, भाजपा नेते राधेश्याम अडाणीया, महामंत्री मिलिंद देशकर, सचिन भोयर, मंगेश श्रीराम, नगरसेवक भूपेश मेश्राम, प्रफुल कावळे, महामंत्री दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा माया धोटे, अरुणा गावत्रे, रेश्मा चव्हाण, प्रदीप पाला, राजकुमार भोगा, श्रीकृष्ण गोरे, सागर भटपल्लीवार, नितीन सिडाम, प्रदीप बोबडे, पंढरी रासेकर, बाबाराव कावळे, नानाजी देवाळकर, वैभव पावडे, अमोल मोरे, स्वप्नील राजुरकर, शिवा बोंकुर, बालाजी भोंगळे, भाऊजी वैद्य, विनोद नामेवार, राजू डाखरे, विवेक राठोड, ओम रागीट, रजनी बोढे, संगीता डाहुले, साधना लांडे यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *